रविना टंडन मनालीमध्ये करतेय एन्जाॅय

0

मुंबई ः प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन मागील काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये एका वेब सिरीजच्या चित्रीकरणासाठी गेलेली दिसत आहे. आपल्या कामातून वेळ काढून रविना टंडन मनालीतील थंडीचा आनंद घेत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये रविना शाहरुख खानच्या पोजमध्ये उभी राहून फोटो काढताना दिसत आहे. तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे आणि मोठा बूटदेखील घातलेला आहे. हा फोटो शेअर करताना रविनाेने शाहरुख खानचा उल्लेख केला आहे.

रविना लिहिते की, ”सुंदर हिमालचमधील डोंगरांमध्ये ‘स्वित्झर्लंडमधील शाहरुख’ यांच्या अंदाजात. माझ्या सुंदर भारतावर माझे प्रेम आहे. हा माझा देश आहे.” रविनाने या दिवसांमध्ये मनाली फिरुन घेतली आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे त्यांच्या वेब सिरीजचे काम थांबते आहे. त्यानंतर रविना मनाली फिरण्यासाठी बाहेर पडते.

काही मंदिराना भेटी देते आणि काही आप्तस्वकियांशी गप्पा मारते आहे. तिच्या चित्रपटांवर बोलायचं झालं तर, ती केजीएफ-२ मध्ये रविना दिसणार आहे. अनेक दिवसांनतर ती मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.