उद्योजक अविनाश भोसले यांची लंडनमधील मालमत्ताही वादात

0

पुणे : उद्योजक अविनाश भोसले यांनी घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी केल्याचा सीबाआयचा आरोपपत्रातून दावा करण्यात आला आहे. त्यांची लंडनमधील मालमत्ताही आता वादात सापडली आहे. तीन दिवसांपूर्वी सीबीआयने अविनाश भोसलेंविरोधात आरोपपत्र दाखल केले त्यातून हि माहीती समोर आली आहे.

लंडनमधील फाईस ट्रॅक ही अलिशान आणि ऐतिहासिक वारसा असलेली ईमारत 2018 मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. या ईमारतीत दोनशे खोल्यांच्या हाॅटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनोदय होता. बर्मिंगहम पॅलेसजवळ ही मालमत्ता होती त्यामुळे भारतीय उद्योजकाने ही ईमारत खरेदी केल्यानंतर मोठी चर्चाही झाली होती

या हाॅटेलसाठी एक हजार कोटी रुपयांपैकी सातशे कोटी रुपये कर्ज स्वरुपात भोसलेंनी एस बॅंकेकडून घेतले. त्याचाच तपास सीबीआय करीत आहेत. या कर्जात अनियमितता आहे. केवळ कन्सलटन्सी फ्री म्हणून सत्तर कोटी दिले गेले, रेडीयस ग्रूप आणि डीएचएफएलकडून यांच्याकडून एकूण सहाशे कोटी रुपये जमवले होते त्यात स्वतः तीनशे कोटींची रक्कम भरत व्यवहार ईमारत खरेदीसाठी केला होता.

हा व्यवहार सीबीआयच्या रडारवर आहे. या व्यवहारांचा तपशिल काय होता याचाच तपास सीबीआय करीत आहेत, सध्या अविनाश भोसले सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची परत सीबीआय कोठडी घेतली जाऊ शकते आणि परत चौकशी केली जाऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.