पिंपरी : रांजणगाव एमआयडीसी जवळ अष्टविनायक रोड आणि मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर पिनॅकल सिटी एन ए बंगलो प्लॉटस एक लक्झरी आणि प्रीमियम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 46 एकर जागा आहे, या 46 एकर मध्ये 4 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या प्रकल्पामध्ये वृक्ष लागवड करताना घनवन ज्यांना जापनीज भाषेमध्ये मियावाकी फॉरेस्ट म्हणतात असे दोन प्रकल्प करण्यात आले आहेत. पर्यावरणासाठी जास्तीत जास्त झाडे एका जागेमध्ये लावणे याला घनवन असं म्हणतात. याचा उपयोग पक्षी ,बायोडायव्हर्सिटी आणि एकूणच निसर्ग साठी होतो .संपूर्ण प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात देशी वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
प्रकल्पातील कॉमन एरियात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे .या दिवशी या प्रकल्पातील शंभर प्लॉट होल्डर्स यांच्या प्लॉटमध्ये एक केशर आंबा लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमासाठी 300 हून जास्त पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. यामध्ये मुख्यतः माजी आमदार विलासराव लांडे, जनता दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, राष्ट्रवादी पक्ष जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब नरके, पर्यावरणप्रेमी हिरामण भुजबळ आणि इतर उद्योजक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
पिनॅकल सिटी मध्ये सामाजिक आणि पर्यावरणाच्या बांधिलकीतून हा उपक्रम करण्यात आला. काही पर्यावरण प्रेमींना तुळशीचे रोप देऊन त्यांना आपल्या घरी ते रोप लावावे यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. पर्यावरण संदर्भातली प्रदर्शनी या कार्यक्रमांमध्ये लावली होती हरित घर म्हणजे काय याची संपूर्ण माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाचे सर्व नियोजन संजय लंके, अजय लंके, राघवेंद्र खेडकर, महेश खेडकर ,रोहित लंके, निखिल खेडकर हे या प्रकल्पाचे प्रमुख यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये आलेल्या प्रत्येक पर्यावरण प्रेमिला तुळशीचे रोप देऊन कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश करपे यांनी केले.