परमबीर सिंग यांच्या विरोधातील गुन्ह्यांच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना

0
मुंबई  : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विशेष म्हणजे यातील काही फिर्यादी हे पोलीस अधिकारीच आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी या खंडणीच्या गुन्ह्यासह परमबीर सिंग यांच्याविरोधातील दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या एसआयटी प्रमुख पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा
अधिकारी करेल. तसंच या एसआयटीमध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.
काही दिवसांपूर्वी भाईंदर येथील बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल  यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून परमबीर सिंह आणि इतर पाच पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा तपास एसआयटी करणार आहे. त्याचबरोबर जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास देखील एसआयटी करणार आहे.
श्यामसुंदर अग्रवाल यांचा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकील याच्याशी संबंधी असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. परमबीर सिंह यांच्या विरोधात मुंबईत एक तर ठाण्यामध्ये दोन असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.