आजदेखील केंद्र आणि शेतकऱ्यांची चर्चा निष्फळ!

0

नवी दिल्ली ः कृषी कायद्याविरोधात मागील दीड महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर ठिय्या करून बसलेल्या शेतकरी नेत्यांची आणि केंद्राची आज आठवी बैठक पार पडली. तरीही केंद्र त्यांच्या भूमिकेवर अडून आहे आणि शेतकरीदेखील त्यांच्या भूमिकेवर अडून आहेत. त्यामुळे आजचीदेखील चर्चा निष्फळच ठरली. आता पुढची बैठक ही १५ जानेवारीला होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना एका शेतकरी नेत्याने सांगितले की, “कायदा परत घेतलात तरच आमची घरवापसी होईल. सुप्रीम कोर्टाने शेती हा कोर्टाचा विषय असल्याने केंद्राने त्यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे सुनावले होते सरकारला या विषयावर तोडगाच काढायचा नाही, असे स्पष्ट दिसत आहे. आम्हाला काय ते स्पष्ट काय ते सांगा आम्ही निघून जातो. उगाच प्रत्येकाचा वेळ कशाला वाया घालविता”, अशी प्रतिक्रिया संबंधित नेत्याने दिली.

आजच्या बैठकीत अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या समन्वय समितीच्या सदस्य कविता उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की, “सरकारने सांगितले आहे की, आम्ही केलेले कृषी कायदे रद्द केले जाणार नाहीत.” शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर  २६ जानेवारीला राजधानीमध्ये शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.