पुणे रेल्वे स्थानकावर बाँब सदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

0

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर दोन बाँब सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे संपुर्ण परिसर सील करण्यात आला असून बाँब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अज्ञात व्यक्तीने ही स्फोटके ठेवली आहेत. दरम्यान पोलिसांनी एक बाँब सदृश्य वस्तू निकामी केली आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर बाँब सदृश्य वस्तू सापडल्यानंतर लागलीच बाँबशोधक पथक घटनास्थळी पोहचला आहे. पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले आहे. पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वेही थांबण्यात आल्या आहेत. पुणे रेल्वे स्थानकाचा परिसर सील करण्यात आला आहे. दुसरीकडे पुण्यात बॉंब सापडल्यामुळे गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

बॉम्ब शोधक पथकाने बाँब सदृश्य वस्तू निकामी करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.  घटनेची रेल्वेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांनी माहिती घेतली असून सुरक्षेच्या द्दष्टिने सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

बाँब सदृश्य वस्तू निकामी केल्यानंतर आता पोलिसांनी चौकशी वेगाने सुरु केली आहे. पोलिसांनी ही वस्तू कोणी ठेवली त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसर प्रवाश्यांसाठी मोकळा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.