पिंपरी : काळेवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत महाराष्ट्र–तेलंगणा बॉर्डरवरील मदनुरयेथे आढळून आला आहे. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
शिवशंकर शिंदे असे मृत झालेल्या वकिलाचे नाव आहे. अॅड. शिंदेंचे कार्यालय काळेवाडी परिसरात असून ते तेथून बेपत्ता झाल्याबाबतची तक्रार वाकड पोलिस ठाण्यात दाखल आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असतानाच ही खळबळजनक बाब प्रकाशझोतात आलीआहे. शिंदेंची हत्या की आणखी काय याबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत.
शनिवारी दुपारी अॅड. शिवशंकर शिंदे हे त्यांच्या कार्यालयातून बेपत्ता झाले होते. त्यांच्या परिवाराकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचाप्रयत्न केला जात होता मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर काही तास उलटून गेल्यानंतर अॅड. शिंदे यांचा अर्धवट जळलेला मृतदेह महाराष्ट्र–तेलंगणा बॉर्डरवरमदनुर येथे आढळून आला. त्यामुळे सर्वांचीच भंबेरी उडाली असून प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अॅड. शिंदेंच्या कार्यालयामध्येच त्यांची एका अज्ञाताशी झटापट झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. कार्यालयामध्येतुटलेली बटन आणि रक्त आढळून आलं आहे. अपहरण आणि त्यांनंतर हत्या झाली काय असा संशय देखील व्यक्त करण्यात येतअसून पोलिस सर्व बाजूने तपास करीत आहेत.
गुन्हे शाखेच्या पथकांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेजव्दारे देखील तपास सुरू आहे. एकंदरीतकाळेवाडी परिसरातून कार्यालयातून बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह महाराष्ट्र–तेलंगणा बॉर्डरवर आढळल्याने पिंपरी–चिंचवड आणिपरिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.