दोन्ही डोस घेतलेल्याना निर्बंधातून सूट : राजेश टोपे

0
मुंबई : राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनासंबंधी अनेक निर्बंध अजूनही लागू आहेत. हे निर्बंध हटण्यासंबंधी तसेच लसीकरण आणि राज्य सरकारची तयारी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
राजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत. विमानतळावर निगेटीव्ह अहवाल असल्याशिवाय परवानगी नसायची, त्यांना आयसोलेट केलं जायचं.
आता लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर आपण प्रवाशांना मुंबईत प्रवेश देत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, आमची अपेक्षा आहे की, महिने दोन महिन्यात राज्याचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी.
आम्ही रोज जशी लस येईल तसं अडीच-तीन लाख लसीकरण करतोय. लस जास्त प्रमाणात मिळाली तर हे प्रमाण वाढेल. जर ७० ते ८० टक्के लसीकरण झाले. तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या महामारीमध्ये गरजेची असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
अद्याप लोकलबाबत निर्णय झालेला नसेल. पण दोन लस घेतल्या असतील तर अनेक निर्बंध शिथिल करायला हवेत. या विचारांच्या बाबतीत कोणाचंही दुमत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि टाक्स फोर्स योग्य निर्णय घेतील, असा मला आशावाद आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.