पुणे : लग्नानंतर समलैंगिक जोडीदार दुरावेल, या भीतीतून मित्राचा खून करुन स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना तपासात निष्पन्न झाली आहे.
सुदर्शन बाबुराव पंडित (30, रा. जानेफळ, ता. जाफराबाद, जालना) या पीएचडी झालेल्या तरुणाचा खून झाला आहे. तर रविराज राजकुमार क्षीरसागर (24, रा. लाक, ता. औंढा, हिंगाेली) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे.
डेटिंग ऍपवरुन सदर दाेघांची ओळख झाली हाेती आणि त्यानंतर समलैंगिक प्रेमसंबंध निर्माण झाले हाेते व सुदर्शन पंडित याचे लग्न ठरले हाेते आणि ताे आपल्यापासून दूर जाईल या भीतीने त्याचा आराेपीने चाकूने गळा चिरून व त्यानंतर चेहऱ्यावर दगड घालून खून केला हाेता, अशी माहिती पाेलीस उपआयुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे.
सदर खुनाच्या घटनेनंतर आराेपीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांना 26 फेब्रुवारी राेजी सुदर्शन पंडित याचा मृतदेह सापडल्यानंतर पाेलिसांनी आराेपीचा शाेध सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आराेपी रविराज क्षीरसागर याचे नाव निष्पन्न झाले.
त्यानुसार पाेलिसांचे पथक त्याचा तपास करत असतानाच, आराेपी क्षीरसागर याने त्याचे राहते घरी काेणी नसताना सुसाईड नाेट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे आई-वडील घरी आले असता त्यांना रक्ताचे थाराेळयात पडलेला मुलगा मिळून आला. त्यांनी त्याला वारजे येथील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले.
दरम्यान, चतृश्रृंगी पाेलीसांना आराेपीचे घराचा ठावठिकाणा मिळाला असता त्याचे घरी जाऊन चाैकशी केली असता, त्याच्या पत्नीने पतीस रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.
पाेलिसांनी आराेपीकडे तपास केला असता, आठ महिन्यापूर्वी सदर दाेघांची डेटिंग साइटवरून ओळख हाेऊन प्रेमसंबंध तयार झाले. परंतु सुदर्शन पंडित याचे लग्न ठरल्याने मागील 15 दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाले हाेते.
पंडित याचे लग्न झाल्यास ताे आपल्यापासून लांब जाईल, या मानसिकतेतून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली.
सुदर्शन पंडित हा पुण्यातील काेथरुड परिसरात पाच मित्रांसमवेत राहात हाेता आणि मागील काही महिन्यांपासून माेबाईलवर अधिक प्रमाणात बाेलत हाेता. याबाबतची माहिती पाेलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे दाेन जणांची नावे निष्पन्न केली.