पुणे : मैत्रिणीने प्रेमसंबंध पुढे सुरु ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणावरून सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाने मैत्रिणीचे न्यूड फोटो, अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर बनावट खाते तयार करुन पॉर्नसाईटवर अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मार्च ते सप्टेबर २०२२ दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी एका २५ वर्षाच्या तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमेय दबडे (रा. पिंपरी चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी तरुणी आणि अमेय दबडे कोकणातील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर तरुणीने त्याच्यासाबोत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर अमेयने तिला तिचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्याला तिने नकार दिला.
अमेयला तरुणीचा सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामचा आयडी व पासवर्ड माहिती असल्यामुळे त्याने तिच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर तिचे न्यूड फोटो पाठवले. तसेच त्याने तिच्या नावे बनावट पॉर्नसाईटवर खाते तयार करून, त्यावर तिचे न्यूड फोटो व अश्लिल व्हिडिओ अपलोड केले. तिच्या या तरुणीचा मोबाईल क्रमांक त्या पॉर्न साईटवर अपलोड केल्यानंतर तिला फोनवर अश्लिल भाषेत लोक संवाद साधू लागले.
दरम्यान हा प्रकार तरुणीच्या लक्षात आला. तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांनी पुढील तपासासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.