क्राइम ब्रँच युनिटचे अधिकारी योगेश चव्हान यांनी सांगितले की, ही टोळी बालकांच्या जन्मदात्यांकडून बालकांना 60 हजार रुपये ते दिड लाख रुपयापर्यंत खरेदी करत होती आणि नंतर अडीच ते साडेतीन लाख रुपयापर्यंत अशा जोडप्यांना विकत होते ज्यांना मुल नाही.
अटक केलेल्या आरोपींची नावे रुपाली वर्मा (30), निशा अहिरे (38), गुलशन खान (34), गीतांजली गायकवाड (38)(ही एका हॉस्पीटलमध्ये नर्स आहे), आरती सिंह (29) (हा एका हॉस्पीटलमध्ये लॅब टेक्नीशियन आहे) आणि धनंजय बोगे (58) (हा एक बीएचएमएस डॉक्टर आहे, ज्याचे लोअर परळमध्ये क्लिनिक आहे) अशी आहेत. पोलिसांनी तीन आरोपींची नावे गुप्त ठेवली आहेत, कारण यापैकी दोन आरोपी मुलांचे जन्मदाते आहेत, तर एक आरोपी ज्याने बालकाला खरेदी केले आहे आणि त्याचे पालन पोषण करत आहे.
कसा झाला खुलासा ?
चव्हाण यांनी सांगितले की, त्यांना माहिती मिळाली होती की, बांद्राच्या खेरवाडी परिसरात काही लोकांनी बालकांना विकले आहे तर कुणी विकण्यासाठी मदत केली आहे, ज्यानंतर आम्ही तिथे ट्रॅप लावून तीन लोकांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली. चौकशीत या संपर्ण टोळीची माहिती मिळाली.
ही टोळी कशी काम करत होती?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले डॉक्टर, नर्स आणि लॅब टेक्नीशियन या टोळीचे मुख्य सदस्य आहेत. ते अशा लोकांचा शोध घेत असत ज्यांना मुल हवे आहे पण मोठ्या कालावधीपासून मुलबाळ होत नव्हते. याशिवाय ते अशा लोकांचाही शोध घेत असत जे मुलांचे पालन पोषण करण्यास असमर्थ आहेत. या गोष्टींचा शोध घेतल्यानंतर ते ही माहिती आपल्या टोळीतील दलालांना देत असत आणि नंतर दलाल दोन्ही जोडप्यांना बालक विकणे आणि खरेदी करण्यासाठी तयार करण्यास सुरूवात करत असत.