फडणवीसांनी शास्त्रीय गायनात ‘डीजे’ लावला

0

मुंबई ः ”फडणवीसांना बऱ्याच दिवसांनी सूर लागला असं वाटत होतं. पण, पहिली ताण घेताच त्यांना टीकेची उबळ आली आणि सूर बिघडून गेले. कोणत्या वेळी कोणता राग गावा याचं शास्त्र आहे. पण, शास्त्रीय गायन सुरू असतानाच डीजे लावावा तसे घडले”, अशी मिश्किल टोला सामना अग्रलेखातून शिवसेनेने लगावलेला आहे.

अठरा दिवसांपासून पंजाब हरियाणाचा शेतरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतोय. त्यांच्या पाण्याचे फवारे मारणे, अश्रुधूर सोडणे यास कोणता आणीबाणीचा प्रकार म्हणायचा, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने पुढे म्हटलेलं आहे की, महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही ह जनताचे ठरवेल. पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचं काय? त्या आणीबाणीवर बोल, असंही शिवसेनेनं म्हटलेलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी प्रश्नावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत म्हटले होते की, महाराष्ट्रात अघोषीत आणीबाणी आहे, अशी टीका केली होती. त्या वक्तव्याचाच समाचार घेत शिवसेनेनं म्हटलं की, ज्यांना महाराष्ट्रातील कथित आणीबाणीचा त्रास होतोय त्यांना देशातील एकांगी कारभार व हुकुमशाही प्रवृत्तीची भिती वाटत नाही का, असा प्रश्न शिवसेनेने केला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.