फडणवीस म्हणाले, ” उधार राजाचे जाहीर आभार”

0

मुंबई ः आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यात होते. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आतापर्यंत झालेल्या कामाचे आणि त्याचबरोबर या प्रकल्पामुळे विकसीत होणारी सिंचन क्षमता याची संपूर्ण माहिती घेतली. त्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव टाकरेंवर निशाना साधला.

फडणवीस म्हणाले की, “मा. मुख्यमंत्री यांचा अधिवेशन वगळता १४ महिन्यातील आज पहिला नागपूर दौरा. या दौऱ्यापूर्वी कालच शेतकऱ्यांच्या अंतिम मदतीचा जीआर जारी करण्यात आला. पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रचंड अशी ११ कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. ‘उधार‘राजाचे जाहीर आभार”, असा खोचक टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
यापूर्वीदेखील उद्धव ठाकरे जेव्हा सोलापूर दौऱ्यावर होते, तेव्हाही फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३ हजार रुपयांच्या चेकचे वाटप करण्यात आले होते, तेव्हा फडणवीस यांनी ठाकरेंवर शिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, ”मुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती जेव्हा अशा ठिकाणी जाते, तेव्हा त्यांच्या हस्ते किती रक्कम द्यावी, याचा काहीतरी शिष्टाचार ठरविण्यात आला पाहिजे. असा प्रकारची मदत म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ याच म्हणीप्रमाणे आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.