चालू वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा होणार खंडीत

0
नागपूर : चालू वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांना 15 दिवसांची नोटीस देऊन वीज खंडित केली जाणार असल्याची माहिती ऊर्जामंतत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. 100 युनिट वीज बिल माफी देणार असं आपण सांगितलंच नव्हतं असा दावाही त्यांनी केला आहे.

लॉकडाऊनमध्ये वीजेचा वापर केला नसतानाही मोठ्या प्रमाणात वीज बिल देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यावरुन वीज बिल भरु नका असं आवाहन विरोधकांकडून करण्यात आलं आहे. वाढीव वीज बिलाविरोधात मनसे आणि भाजपनं आंदोलनही केलं आहे. असं असलं तरी वीज बिल भरावंच लागेल असं ऊर्जामंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय.

महाविकास आघाडीचा शपथविधी शेतकऱ्यांच्या साक्षीनं झाला आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजपचं वीज बिल आंदोलन फसवं आहे. इंधन दरवाढ, धान्य दरवाढ होत आहे. अशावेळी 10 महिने वीज बिल भरलं नाही तर महावितरण जगणार कशी? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. वीजनिर्मितीसाठी पैसे लागतात. त्यामुळे जनतेनं वीज बिल भरावं, असं आवाहन त्यांनी केलंय. तुमचं वीज बिल भरणं म्हणजे महावितरणसाठी जगण्यामरण्याचा प्रश्न असल्याचंही राऊत म्हणालेत.

थकबाकीदार बनवण्याचं काम भाजपनं केलंय. केंद्र सरकार खासगी कंपन्यांसाठी महावितरणला खड्ड्यात घालण्याच्या तयारीत आहे. सरकारी कंपनी ही सरकारी असते. त्यात सवलती मिळतात. मात्र, खासगीकरणाचा घाट केंद्र सरकार घालत असल्याचा आरोप ऊर्जामंत्र्यांनी केलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.