मृताच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर : राजेश टोपे

0

मुंबई ः “भंडारा जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या कुटुबियांच्या दु:खात मी सहभागी असून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे”, अशी घोषणा राज्य आरोग्य मंत्री यांनी जाहीर केली आहे.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, “भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने ७ बालकांना वाचविण्यात यश आले. पण या दुर्घटनेमुळे १० बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला”, अशी सविस्तर आणि प्रत्यक्ष माहिती टोपे यांनी दिली.

भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगी १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली, त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांची चर्चा करून चौकशीचे आदेश दिलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.