सेक्स रॅकेटच्या दलदलीमधून प्रसिद्ध अभिनेत्रीची सुटका

0
मुंबई : पॉर्न फिल्म रॅकेटचा भंडाफोड करणाऱ्या पोलिसांनी एका अभिनेत्रीला सेक्स रॅकेटच्या दलदलीतून बाहेर काढलं आहे. तिच्यासोबत एका मॉडेलचीही पोलिसांनी सुटका केली आहे. जुहूमधल्या एका हॉटेलमध्ये हा ‘डर्टी गेम’ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. मालिकांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री अत्यंत प्रसिद्ध असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दलाल महिलेला अटक केली असून तिचं नाव इशा खान असल्याचं कळतं आहे. गेली अनेक वर्ष इशा खान ही सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती मिळाली होती. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे सेक्स रॅकेट उध्वस्त करण्याची योजना तयार केली. त्यांनी पोलिसांचा एक कर्मचारी नकली ग्राहक बनवून इशा खानकडे पाठवला होता. माझ्या एका मित्राला टॉप मॉडेल्स हव्या आहेत असं त्याने इशा खानला सांगितलं होतं. यानंतर इशा खानने त्याला बरेच फोटो व्हॉटसअपवर पाठवले. यातले दोन फोटो पोलीस कर्मचाऱ्याने निवडले होते. अनेक मालिकांमध्ये काम केलेले अभिनेत्रीला आणि अनेक जाहिरातींमध्ये दिसली असल्याने मॉडेलला ओळखणं पोलिसांना अवघड गेलं नाही.
इशा खानने या दोघींसाठी दोन तासाचे 2 लाख रुपये होतील असं सांगितलं होतं. पोलीस कर्मचाऱ्याने पैसे देण्याचं मान्य केल्यानंतर त्याला इशा खानने जुहूतील हॉटेलमध्ये बोलावलं होतं. गुरुवारी इशा खान, अभिनेत्री आणि मॉडेल हॉटेलमध्ये पोहोचताच पोलिसांनी तिघींना ताब्यात घेतलं. कोरोनामुळे काम मिळणं बंद झाल्यानं आपण नाईलाजाने या धंद्याकडे वळल्याचं अभिनेत्रीने तसंच मॉडेलने सांगितलं आहे. नवभारत टाईम्सच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.