प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

0

पुणे :  पुण्यातील प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूनां मुंबई पोलिसांनी पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे (63) आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे (59) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंदरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सीआर नं. 492/2021 कलम 476, 467, 68, 406, 420 व 120 (ब) कलमानव्ये गुन्हा नोंदविलेला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, फिर्यादी या परांजपे कुटुंबाशी संबंधित आहेत. परांजपे यांच्या काही जागा या मुंबईतील विलेपार्ले येथे आहेत. ती जागा विक्री करण्यात आली आहे. फिर्यादी या वारस आहेत. मात्र ही जागा विक्री करत असताना फिर्यादी यांना कळू न देता ही जागा विक्री केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती.

याबाबत आज दुपारी विलेपार्ले पोलीस ठाण्यात खोटेदस्त बनवून तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केला. त्यानुसार परांजपे बंधूंना विलेपार्ले पोलिसांच्या पथकाने रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना घेऊन विलेपार्ले पोलीस मुंबईला रवाना झाले आहेत. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.