मुंबई : फेमस स्टँड-अप कॉमेडियन आणि अभिनेता राजू श्रीवास्तव यांना काही दिवसाआधी हार्ट अटॅक आला होता. अखेर ४२ दिवसांच्या संघर्षानंतर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा ते दिल्लीच्या एका जिममध्ये एक्सरसाइज करत होते. राजू श्रीवास्तव एक्सरसाइज करताना ट्रेडमिलवर धावत होते. एक्सरसाइज करताना ह्रदयविकाराचा झटका येण्याची भीती असते का? आणि या पासून कसं स्वत:ला जपायचं? या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
असं म्हणतात की एक्सरसाइज केल्यानेही ह्रदयाच्या समस्या आणखी वाढतात आणि अनेक आजार होण्याचीही शक्यता असते. जास्त हार्ड एक्सरसाइज केल्यानेही ह्रदयाचे आजार होण्याची शक्यता असते. अशात ज्यांना आधीपासूनच हार्टसंबंधी समस्या आहे त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
एका रिपोर्टनुसार high intensity exercise केल्याने हार्ट पेंशटच्या लोकांना अचानक कार्डियक अरेस्ट आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो. हार्ट रिदम डिसऑर्डरही होऊ शकतो.
हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ दिसत आहे. चिंतेचा विषय म्हणजे यंग लोकांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याबाबत योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
असं म्हटले जाते की हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि हाय ब्लड कोलेस्ट्रॉल असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो. एक्सपर्ट्स सांगतात की अशा लोकांनी त्वरीत लक्षणांना ओळखून काळजी घेतली पाहीजे.
हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट पासून वाचण्यासाठी धूम्रपान किंवा मद्यपान टाळावे. अचानक कार्डियक अरेस्टपासून वाचण्यासाठी नियमित हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. जो आधीपासून ह्रदय रोगापासून पिडीत आहे त्यांनी नेहमी डॉक्टरांच्या सल्ला घेत रहावा.