लाल किल्यावर शेतकरी आंदोलक हिंसक; व्हिडिओ व्हायरल

0

दिल्ली : प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना शेतकरी आंदोलक आक्रमक झाले आणि शेतकऱ्यांकडून हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलक लाल किल्यावर घुसले आणि तेथील एक पोलिसांचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

दिल्लीत प्रवेश केल्यानंतर शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले होते. यावेळी तिथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांनी काठ्यांनी हल्ला केला. एएनआयने शेअर केलेल्या व्हिडीओत जवळपास डझनहून अधिक पोलीस कर्मचारी आणि निमलष्करी दलाचे जवान संतप्त शेतकऱ्यांच्या हल्ल्यातून आपला जीव वाचवण्यासाठी लाल किल्ल्याच्या इमारतीवरुन उड्या मारताना दिसत आहे.

व्हिडीओत शेतकरी पोलिसांना काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. शेतकरी आतमध्ये घुसताच पोलिसांना तेथील कठड्यावर चढून आणि नंतर भिंतीवरुन उडी मारताना व्हिडीओत दिसत आहे. यावेळी काही पोलीस कर्मचारी मात्र शेतकऱ्यांसोबत संघर्ष करत होते. दरम्यान हे सर्व सुरु असताना एक ट्रॅक्टर रेलिंगच्या दिशेने येऊन पोलिसांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

मंगळवारी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या हिंसाचारात दिल्लीचे ८० पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. यामधील काही जणांची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे आयकर कार्यालयाच्या ऑफिसजवळ ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आठ बसेस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांकडून चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.