भयमुक्त पिंपरी-चिंचवड शहर हेच टार्गेट

परमबिर सिंग, वाझे प्रकरणावर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया

0
पिंपरी : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केली. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय.

यावर डॅशिंग आयपीएस अधिकारी तथा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांवर होणारे हे आरोप मनाला न पटणारे आहेत, असं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

शहरात कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो… तो सरकारचा समर्थक असो वा विरोधातला, त्याच्याशी पोलिसांचा संबंध नाही. कारण गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, असं कृष्ण प्रकाश यांनी म्हटलं आहे.

एखाद्या ठिकाणी कोणतेही काम करायचे असेल तर प्रथम त्या ठिकाणच्या प्रमुखाला सांगितले जाते. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य वाटत नाही. सर्वात महत्वाचे जो चुकीचे काम करतो त्यांनाच टार्गेट असते. आपले टार्गेट म्हणजे भयमुक्त पिंपरी-चिंचवड शहर असे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.