लाच स्विकारताना महिला पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

सहाय्यक फौजदार पळून जाण्यात यशस्वी

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सांगवी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या महिला उपनिरीक्षकाला पकडले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली असून, पोलीस ठाण्याच्या परिसरातच कारवाईचा थरार घडला आहे.

महिला उपनिरीक्षक हेमा सोळुंखे असे जाळ्यात पकडलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. तर एएसआय फरार झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काही वेळापूर्वी ही कारवाई करण्यात आली.

सांगवी पोलिस ठाण्यात या महिला उपनिरीक्षक कार्यरत आहेत. अर्ज तक्रारीत कारवाई न करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. त्यात तक्रार करण्यात आली होती. एसीबीने त्यानुसार पडताळणी केली. त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली. ७० हजार रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले आहे. या कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.