फसवणूक प्रकरणी निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल

0
पुणे : जमीनेचे बनावट कागदपत्रे सादर करून, कर्ज घेऊन, पत संस्थेची 1 कोटी 20 लाख रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या पत्नीसह पाच जनांवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सचिन दत्तात्रय टेमगिरे (40), अमोल दत्तात्रय टेमगिरे (39) मनोज दत्तात्रय टेमगिरे (37), पत्नी मंगला दत्तात्रय टेमगिरे (62, (सर्व रा. फ्लॅट नं. 1301, 1302, विंग एफ, इंद्रधनु सोसायटी, वनाज कंपनी जवळ, कोथरूड)) आणि भगवान विठोबा बराटे (रा. कृष्णकुंज, कर्वेनगर), आणि गणेश भागुजी कराळे (54, रा. 15, स्नेहांकीत कॉलनी, कर्वेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारस अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी संस्थेकडून 1 कोटी 20 लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी तारण म्हणून त्यांनी वारजे येथील गट नं. 73 ही जागा ठेवली होती. कर्ज मिळाल्यानंतर त्यांनी काही महिने नियमानुसार संस्थेचे हप्ते भरले. पण यानंतर त्यांनी हप्ते भरण्यास टाळाटाळ केली.

त्यावेळी तारण ठेवलेली जागाच अस्तित्वात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली असता जागा अस्तित्वात नसताना त्याचे बनावट कागदपत्रे सादर केले. हे काम आरोपींनी संगनमताने व माहित असताना खोटे व बनावट केल्याचे लक्षात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.