माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूध्द केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तसेच आज सकाळपासून त्यांच्या मुंबई, नागपूर येथील घरांवर आणि छापेमारी सुरु आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांविरूध्द सीबीआयनं गुन्हा दाखल केल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या हप्ता वसुलीचे आरोप केले होते. प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय देशमुख यांची चौकशी करीत होते. दरम्यान, आज देशमुख यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली तर त्यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.