आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0
सांगली : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड इथं बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा 19 जुलै रोजी पार पडला होता. त्यावेळी गर्दी जमवल्याप्रकरणी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून बहिर्जी नाईक यांचं स्मारक साकारलं जात आहे. या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पार पडला. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे निमंत्रक गोपीचंद पडळकर होते.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते. याच हिरकांच्या कोंदणातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक. बुद्धीचातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिर्जी नाईक’, अशा शब्दात फडणवीस यांनी बहिर्जी नाईक यांच्या शौर्याला नमन केलं होतं.
Leave A Reply

Your email address will not be published.