शहरातील गणेश कला क्रीडा रंगमंचमध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेतील भाषणावरून नवा वाद सुरू होता. त्यानुसार याप्रकरणी पोलिसांकडून सर्व भाषणाची तपासणी करून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रदीप गावडे यांनी फिर्याद दिली आहे.
एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने हिंदू धर्मावर खालच्या भाषेत टीका केल्यामुळे पडसाद उमटले आहेत. त्यानुसार आता त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्गार परिषदेत अनेक वक्ते सहभागी झाले होते. त्यात शर्जील उस्मानी याच्या वक्तव्यावर वाद सुरू झाला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेत झालेल्या उस्मानी याच्या भाषणाची चौकशी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यातील एल्गार परिषदेत शर्जील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रा द्वारे केली होती.