पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड याच्याविरोधात अनेक तक्रारी पोलिसांकडे येऊ लागल्या आहेत. पोलिसांकडे आलेल्या 35 तक्रारी वरुन फसवणूकीचा आकडा 50 कोटींवर जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पुण्याच्या गुन्हे शाखेकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे.
येरवडा पोलीस ठाण्यात संजय होनराव (48) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लुंकड रियालिटी फर्मचे अमित लुंकड यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना या गुन्ह्यात लागलीच खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अमित लुंकडला अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पोलिसांकडे धाव घेण्यास सुरुवात केली.
प्रथम 4 तक्रारी आल्यानंतर आणखी तक्रारी येत असल्याने खंडणी विरोधी पथकाने पुढील प्रकरण गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिले. त्यानंतर आता या विभागाकडे तबल आतापर्यंत 35 तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार जवळपास 50 कोटींहून अधिक फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. या तक्रारीवर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.