अखेर अतिरिक्त आयुक्त अजित पवार महापालिकेतून कार्यमुक्त

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त 2 अजित पवार यांना बुधवारी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कार्यमुक्त केले आहे . स्पर्श हॉस्पिटल मधील भ्रष्टाचार आणि माजी महापौर योगेश बहल यांनी घेतलेला आक्षेप यामुळे त्याच्या कार्यमुक्तीला कारणीभूत ठरल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे .

पिंपरी – चिंचवड महापालिकेत सप्टेंबर 2019 पासून अजित पवार हे अतिरिक्त आयुक्त 2 या पदावर कार्यरत झाले होते . ज्या दिवशी ते महापालिकेत रुजू झाले , त्याच दिवशी त्यांची पुणे जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती . या पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांना अतिरिक्त आयुक्त या पदावरून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश शासनाचे दिले होते . मात्र , शासनाला पाठविलेल्या एका पत्राचा आधार घेऊन ते दीड वर्षे महापालिकेत कार्यरत होते . या कालावधीत त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामे केली .

स्पर्श हॉस्पिटलमधील भ्रष्टाचाराने अतिरिक्त आयुक्त तात्काळ निर्णय क्षमता ठेवणारे अतिरिक्त आयुक्त म्हणून अजित पवार यांनी सर्व पक्षीय नगरसेवकांची मने जिंकली . मागील एक वर्षात कोरोना काळात त्यांनी अनेक रोखठोक निर्णय घेतले . मात्र , यामधील स्पर्श हॉस्पिटलच्या संदर्भातील बिलामध्ये घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलटी आला . एकही पेशंट नसताना भरपाई म्हणून स्पर्श हॉस्पिटलला पवार यांच्या आदेशावरून ३ कोटी १४ लाख रुपये अदा करण्यात आले . यावरून शहरातील विरोधकांनी राजकीय वातावरण पेटवले होते . यावर स्पर्श हॉस्पिटल मधील भ्रष्टाचार आणि शासनाकडून कायदेशीर नियुक्ती नसल्यावरून योगेश बहल यांनी आयुक्तांना कायदेशीर नोटीस बजावली होती . यामुळेच आज ७ एप्रिल रोजी आयुक्त राजेश पाटील यांनी कामाची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या कामकाजातून अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले .

Leave A Reply

Your email address will not be published.