अखेर ‘पेट्रोल’ने केली शंभरी पार

0

मुंबई : लॉकडाउनच्या काळापासून इंधनाचे वाढते दर सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवत आहेत. सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजस्थानमधील एका जिल्ह्यात तर पेट्रोल ने उच्चांक गाठला असून १०० रुपये १३ पैसे इतका झाला आहे.

राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेटानुसार, नॉन प्रीमिअम पेट्रोलची रिटेल किंमत प्रतिलीटर १०० रुपये १३ पैसे इतकी झाली आहे. देशभरातील पेट्रोल दरांमधील हा उच्चाकं आहे. दुसरीकडे गंगानगरमध्ये डिझेलचा दर ९२ रुपये १३ पैसे इतका झाला आहे.

पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर २५ पेसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर २६ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर ९५ रुपये ४६ पैसे, तर मंगळवारी ९५ रुपये ७५ पैसे इतका होता. तर डिझेलचा दर ९० च्या जवळ पोहोचला आहे. डिझेलचा दर सध्या प्रतिलीटर ८६ रुपये ९८ पैशांवर पोहोचला आहे. सोमवारी हा दर ८६ रुपये ३४ पैसे इतका होता.

दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत २५ पैशांनी वाढले आहेत. यामुळे सध्या पेट्रोलसाठी प्रतिलीटर ८९ रुपये ५४ पैसे आणि डिझेलसाठी ७९ रुपये ९५ पैसे मोजावे लागत आहेत. फक्त १० दिवसांमध्ये इंधनाचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत.

२०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आतापर्यंत २० वेळ वाढवण्यात आल्या आहेत. पेट्रोलच्या दरात एकूण ५ रुपये ५८ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ५ रुपये ८३ पैसे इतकी वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.