निगडी ओटास्कीम मध्ये गोळीबार; आरोपी मोकाट

0

पिंपरी : किरकोळ भांडणातून थेट पिस्तुलातून गोळीबार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना निगडी ओटास्कीम येथे घडली. रविवारी (दि. 20) रात्री पावणे बाराच्या सुमारास बिल्डिंग क्रमांक सातच्या समोर हा प्रकार घडला.

याप्रकरणी भरत ज्ञानोबा थोरात (28, रा सेक्टर क्रमांक 22, आझाद चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर प्रशांत रमेश कोळी (32), सुरज पवार (28), राहुल सोनकांबळे (28, तिघे रा. सेक्टर क्रमांक 22, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत हे भंगारचा व्यवसाय करतात. त्यांच्या भावासोबत आरोपींचे शिवीगाळ करण्याच्या कारणावरून भांडण झाले होते. त्या कारणावरून आरोपी एका स्विफ्ट कार (एमएच 14, 4034) मधून आले. प्रशांत कोळी आणि सुरज पवार यांनी त्यांच्या हातातील पिस्तुलातून फिर्यादी आणि त्यांचा मित्र रफिक यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. आरोपींनी गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, सहाय्यक निरीक्षक व्ही एम धुमाळ, एल एन सोनवणे या अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.