पुणे : राहू येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप (38) याची लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सोनाई समोर भरदिवसा गोळया घालून गेम करणार्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
पंकज मिसाळ, नन्या आदलिंग अशी ताब्यात घेण्यात आलेल्याची नावे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांना गुन्हे शाखेच्या पथकानं अग्नीशस्त्रे आणि वाहनांसह ताब्यात घेतलं आहे. गुन्हा घडल्यानंतर 30 तासाच्या आत पुणे पोलिसांनी संतोष जगतापच्या मारेकर्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी हॉटेल सोनाई समोर राहु येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप (38) याच्यावर गोळीबार झाला होता. त्यामध्ये संतोष जगताप आणि त्याचा अंगरक्षक गंभीर जखमी झाले. दरम्यान, संतोष जगतापचा मृत्यू झाला. संतोष जगतापने देखील फायरिंग केलं होतं. त्यामध्ये स्वप्नील खैरे हा मयत झाला.
संतोष जगतापवर भरदिवसा गोळीबार करणार्याचा शोध पुणे पोलिस घेत होते. दरम्यान, आरोपींबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली. प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर जवळून दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून अग्नीशस्त्रे आणि वाहन जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलतना दिली आहे. पंकज मिसाळ, नन्या आदलिंग यांना ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, आरोपींची नावे आणि इतर माहिती सविस्तरपणे देण्यात येईल असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. इतर फरार आरोपींचा पुणे पोलिस शोध घेत आहेत