संत तुकाराम नगर येथील मेट्रो स्थानकात पहिला ‘एक्सलेटर’

0
पुणे:  मेट्रोच्या पिंपरी येथील संत तुकाराम नगर स्थानकात पहिला सरकता जीना (एक्सलेटर) बसवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया धोरणातंर्गत चाकण येथील कारखान्यात हा जीना तयार करण्यात आला आहे.
मेक इन इंडिया या धोरणातंर्गत केंद्र सरकारने सर्व सरकारी, निम्न सरकारी ऊपक्रमांमध्ये लागणारी यंत्र भारतात तयार केलेली असावीत असे बंधन घातले आहे. महामेट्रो कंपनी त्याचे पालन.करत असून त्यामुळेच मेट्रो स्थानकात हा जीना बसवण्यात आला असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
पूणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवरील ३० स्थानकांमध्ये१६६ एस्केलेटर बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्थानकामध्ये जलदपणे ये जा करता येणार आहे. या एस्केलेटरमध्ये अत्याधुनिक अश्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत एस्केलेटर थांबविण्यासाठी ३ ठिकाणी इमर्जन्सी स्टॉप बटन आहे. प्रवाशांच्या संख्येनूसार त्याचा वेग कमीजास्त करता येणार आहे
Leave A Reply

Your email address will not be published.