मुंबई ः ”माझा तिरस्कार करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. परंतु, मला त्याविषयी कोणतीही तक्रार नाही. मी गर्वाने सांगते की, सर्वात जास्त तिरस्कार करणाऱ्या सिनेतारकांच्या यादीत मी पहिली आहे. पण, माझ्या टोलर्सना हे माहीत नसेल. मी मनापासून त्यांची आभारी आहे”, असे मत व्यक्त करत अभिनेत्री स्वरा भास्करने ट्रोलिंगविषयी पहिल्यांदाच बोलली.
एका मुलाखतीमध्ये तिने हे मत मांडले आहे. स्वरा पुढे म्हणते की, ”चर्चेत राहण्यासाठी मला कोणत्याही चित्रपटाची गरज नाही. माझे ट्रोलर्स मला कायमच चर्चेत ठेवतात. ज्या कामासाठी आपण पीआरची नेमणूक करतो, तेच काम माझे ट्रोलर्स करतात.”
स्वरा भास्कर चालू घडामोडीवर सोशल मीडियावरून स्वतःचे बेधडक मत मांडत असते. त्यातून तिची काही मते ट्रोलर्सना रुचत नाहीत. मग, सोशल मीडियावर तिचा मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. स्वरा पुढे सांगते की,”माझे वडील माझे सगळ्यात चांगले ट्रोरल आहेत. ते उघडपणे ट्रोल करत नाहीत, पण, व्हाॅट्स अप मसेजमधून ट्रोल करत असतात. या फोटोत जाड दिसतेस, खाण्यावर नियंत्रण ठेव, अशा प्रतिक्रिया देतात. तू जाड झालीस मला काही प्राॅब्लेम नाही, तुझ्या करिअरवर परिणाम होईल, त्यामुळेच सांगतोय”, असंगी स्वराने बाबाविषयी खुलेपणाने बोललीय