पुणे-बंगळूर महामार्गावर एकापाठोपाठ पाच अपघात, दोन ठार, आठ जखमी

अपघातग्रस्त जागेची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीलाही कंटेनरने चिरडले

0
पुणे : पुणेकरांसाठी आजचा दिवस घातवार ठरलाय. आज पहाटेपासून पुणे-बंगळूर महामार्गावर एका पाठोपाठ एक असे पाच विचित्र अपघात झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त ठिकाणाची पाहणी करण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झालाय. अपघातांच्या या मालिकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त जागेची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने जोराची धडक दिली. धडक इतकी भयानक होती की यामध्ये पोलिसांच्या महिंद्रा गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. तर नवीन कात्रज बोगदा म्हणून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आणखी एका कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोर असणाऱ्या चार वाहनांना जोराची धडक दिली. यामध्ये एक रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा पार चुराडा झालाय. या अपघातात सहा महिन्याच्या मुलासह तिघेजण जखमी झाले आहेत.

सर आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कात्रज बोगदा कडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका ट्रकला दुसऱ्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये समोरील ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झालाय. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर असून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात झाला असतानाच येथून काही मीटर अंतरावर स्पेअर पार्ट ची वाहतूक करणारा आयशर कंटेनर उलटला. या आयशर कंटेनरला दुसरा ट्रक घासून गेल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.

आज सकाळपासून सुरू असलेल्या या अपघाताच्या मालिकेमुळे मुंबई बंगळूर महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. अग्निशमन दलाचे जवान, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागाचे पोलीस अधिक कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्यानंतर अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.