मुंबई ः “राज्यात आज ३०१८ करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ५५७२ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १८ लाख २० हजार २१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २५५३७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.५४ टक्के झाले आहे”, असे ट्विव करून राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.
दिवसभरात राज्यामध्ये ३ हजार १८ रुग्ण करोनाबाधीत आढळले. तर, ६८ करोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. परिणामी, मृत्यू दर हा २.५६ टक्के इतका झाला आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिलेली आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी २६ लाख ७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९ लाख २५ हजार ६६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २ लाख ८९ हजार ५६० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३ हजार २०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सद्यस्थितीत ५४ हजार ५२७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३,०१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९ लाख २५ हजार ६६ झाली आहे.