गँगस्टर शरद मोहोळ सह पाच जणांना अटक

0

पुणे : येरवडा कारागृहातून निर्दोष सुटका झाल्यानंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गँगस्टर शरद मोहोळ सह पाच जणांना अटक करण्यात आली. खडक पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद हिरामण मोहोळ (38), विश्वास बाजीराव मनेरे (37), मनोज चंद्रकांत पवार (42) स्वप्निल अरुण नाईक (35) योगेश भालचंद्र (40) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अक्षय भालेराव, सिताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

26 जानेवारी रोजी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पतित-पावन संघटनेच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद मोहोळ आणि त्याचे दहा ते बारा साथीदार त्या ठिकाणी आले होते.

Covid-19 अनुषंगाने जमाबंदी आदेश असतानाही आरोपींनी बेकायदेशीर गर्दी जमवून आरडाओरडा करत गुरुवार पेठेत दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.