स्लॅबची लोखंडी जाळी अंगावर कोसळून 5 कामगारांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

0

पुणे : अंगावर स्लॅबला लागणारी लोखंडी जाळी कोसळून 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना येरवडा येथील शास्त्रीनगर परिसरात घडली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला आहे.

शास्त्रीनगर परिसरात वाडिया यांच्या एका इमारतीच्या शेजारी बेसमेटचे काम करण्यात येत आहे. दरम्यान बेसमेंटला स्लॅब टाकण्याची तयारी केली जात होती. यादरम्यान त्यावर स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी जाळीचे कडे करण्यात आले होते. 16 एमएम गजाचे ही भली मोठी जाळी होती.

दरम्यान, रात्री काही कामगार या बेसमेटमध्ये काम करत होते. तर ही जाळी त्याठिकाणी उभा करून ठेवण्यात आली होती. मात्र अचानक ही जाळी निसटली आणि या कामगारांच्या अंगावर पडली. लोखंडी जाळी असल्याने जबर मार लागला. तर काही गज या कामगारांच्या शरीरात शिरले होते.

हा प्रकार घडताच अग्निशमन दलाला खबर देऊन बोलविण्यात आले. त्यांनी कटरच्या सहाय्याने जाळीचे गज कापून यात अडकलेल्या कामगारांना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्याचे काम सुरू होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सर्व कामगारांना बाहेर काढून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यात तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला. तर दोन किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. रात्र असल्याने या कामगारांची नावे समजू शकली नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.