पुणे : हवामानातील बदलामुळे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. गेली दोन दिवस धुके मोठ्या प्रमाणावर आहे. आज रविवारी सकाळी आठ पर्यत सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती.
संपूर्ण पुणे जिल्ह्यात हेच चित्र पाहायला मिळत होते. रस्त्यावर, महामार्गावर चालकांना वाहन चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक ठिकाणी धुक्यामुळे किरकोळ अपघात झाले.
रविवारी पडलेल्या धुक्यामुळे वातावरणात बदल झाला होता. अश्या या वातावरणात व्यायाम करण्यासाठी, धावण्यासाठी, सायकलिंगसाठी अनेक जण बाहेर पडल्याचे चित्र दिसत होते.