मुंबई : स्वतंत्र भारतात प्रथमच महिलेला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे. महिलेने प्रियकरासोबत आपल्या नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता.
उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधील शबनम या महिलेला।फाशी होणार आहे. राष्ट्रपतींनीही तिचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. मथुरा जेलमध्ये तिला फाशी होईल. फाशीच्या अंमलबजावणीची तयारी सुरू झाली आहे.
निर्भया प्रकरणातल्या आरोपीना फाशी देणारा पवन जल्लादचीच या फाशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. फाशीची तारीख मात्र अजून निश्चित झालेली नाही.
मथुरा जेलमध्ये जवळपास दीडशे वर्षांपूर्वीच महिला फाशी घर बनवण्यात आलं पण तिथे आत्तापर्यंत कोणाही महिलेला फाशी दिली नाही. मात्र आता इथे शबनमला फासावर लटकवण्यात येईल.
पवन जल्लादने दोन वेळा या फाशीघराचं निरीक्षण केलं आहे. त्याला त्यात फाशीचं तख्त आणि लिव्हरमध्ये काही दोष जाणवले आहेत. ते तातडीने दुरूस्त केले जात आहेत. बिहारमधील बक्सरमधून फाशीसाठी दोरखंड मागवण्यात आला आहे.