सिगारेट, झाऱ्याचे चटके देत तरुणीसोबत शरीरसंबंधाठी जबरदस्ती
भीतीपोटी पीडितेने पुण्यात दिली तक्रार; चौकशी नंतर गुन्हा हिंजवडीला वर्ग
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन अनोळखी तरुणांनी एका 18 वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिला सिगारेटचा चटका देण्याचा प्रयत्न केला. तसेच लोखंडी झाऱ्या गरम करून त्याचे चटके देत तरुणीवर शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी तीन वाजता हिंजवडी येथे घडली.
याप्रकरणी पिडीत 18 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी फिर्यादी तरुणी घरी होती. त्यावेळी आरोपी दोन तरुण तिच्या घरी आले. एकाने ‘तुमच्या रूममधून पाण्याचा कॅन घ्यायचा आहे’ असे म्हणून घरात प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी तरुणीसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे फिर्यादी यांनी स्टीलचा झाऱ्या आरोपीला फेकून मारला.
आरोपीने त्याच्या दुसऱ्या साथीदाराला घरात बोलावून घेतले. त्यानंतर तरुणीच्या पायावर बसून तिचे तोंड दाबून तिच्यावर शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. आरोपींनी तरुणीला जाळून टाकण्याची धमकी दिली. पेटलेल्या सिगारेटने तरुणीला चटका देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने झटका दिल्याने आरोपीने तरुणीला सिगारेटचा चटका देऊ शकले नाहीत.
त्यांनतर आरोपींनी झाऱ्या गॅसवर गरम केला आणि त्याने तरुणीच्या हातावर चटका दिला. तरुणीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
पीडित तरुणी हि महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. पीडितेने पहिले बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. रिक्षातून जात असताना रिक्षा चालकाने सिगारेटचे चटके दिल्याचे तिने म्हटले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पासून चौकशी केली असता प्रकार वेगळा असल्याचे समोर आले. पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता हिंजवडी येथे घरात घुसून दोन तरुणांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सिगारेट आणि झऱ्याचे चटके दिल्याचे सांगितले. भीतीपोटी खोटी माहिती दिल्याचे तिने सांगितले. यानंतर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा हिंजवडी पोलिसांकडे वर्ग केला.