किशोर आवारे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना

0

पिंपरी : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाचा तपाससखोल व्हावा यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रेरणाकट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्याएसआयटीकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे.

शाम अरुण निगडकर (46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (32), आदेश विठ्ठल धोत्रे (28, दोघे रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नान्या विठ्ठल मोरे (रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगल (41, रा. तळेगावदाभाडे), गौरव चंद्रभान खळदे (29, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

भानुदास खळदे यांची तळेगाव दाभाडे परिसरात एक बांधकाम साईट सुरु होती. त्यासाठी रस्ता करताना खळदे यांनी नगरपरिषदेचीपरवानगी घेऊन झाडांची कापणी केली होती. मात्र किशोर आवारे यांना खळदे यांनी विनापरवाना वृक्षतोड केल्याचे वाटल्याने त्यांनीनगरपरिषदेकडे अर्ज दिला. त्यानंतर खळदे आणि आवारे नगरपरिषदेत एका बैठकीच्या निमित्ताने समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्यातवाद झाला.

त्यावेळी आवारे यांनी खळदे यांना मुख्याधिकारी कार्यालयासमोर कानशिलात लगावली होती. याबाबत खळदे यांनी तळेगाव दाभाडेपोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद करून किशोर आवारे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलीहोती.

भानुदास खळदे यांचा मुलगा गौरव याच्या मनात या प्रकरणाचा राग होता. सर्वांसमोर कानशिलात दिल्याने आपल्या वडिलांची इज्जतगेल्याची भावना त्याच्या मनात होती. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांना जमा करून त्यांना सुपारी देऊन किशोर आवारे यांच्या हत्याघडवून आणली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, पोलीससुपारीसह इतर सर्व शक्यता तपासून पाहत आहेत.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस निरीक्षक आणि एकसहायक निरीक्षक अशी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.