पुणे: चॉकलेट आणि खाऊचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगित आत्याचार केल्याप्रकरणी कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही अदाने यांनी हा आदेश दिला.
मारुती हरी सावंत (वय ६५) असे कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचे नाव आहे. सावंत याला २०१५ मधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून त्याने अर्ज केला होता.
लहान मुलींना चॉकलेट, खाऊचे अमिष दाखवून त्यांचेवर बाल लैंगिक आत्याचार केले. तसेच अश्लील व्हीडिओ दाखवून मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होर्इल असे कृत्य त्यांनी केले. पोलीसांत तक्रार आल्यानंतर त्यावर भांदवि कलम ३७६(अ), ३५४(अ) (ब), ५०६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२चे कलम ४,६,८,१० तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमानी अधिनियम १९८९चे कलम ३ (१), ३ (२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कलम ६७ (अ),(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सावंत यांच्या घरझडतीत सुमारे साडेतीन हजार अश्लील व्हीडिओ मिळून आले होते. कोरोना महामारी तसेच वय ६५ वर्षापेक्षा जास्त असल्याच्या कारणावरून व महाराष्ट्र विधी सेवा प्रधिकरणाच्या १२ मे २०१९च्या शिफारसीस अनुसरुन तात्पुरता जामीन मिळावा म्हणून न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यास विशेष सरकारी वकील प्रताप परदेशी यांनी विरोध केला. आरोपीचा अर्ज हा उच्च अधिकारी समितीच्या शिफारसीस अनुसरुन नाही. आरोपी हा उच्च पदस्थ असल्याने व हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपीस जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद ॲड. परदेशी यांनी केला.