माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे स्वगृही परतले

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वगृही राष्ट्रवादीत परत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बहिरवाडे यांनी आज (गुरुवारी) पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यावेळी उपस्थित होते.

नारायण बहिरवाडे 1997 साली पहिल्यांदा ते चिंचवड स्टेशन प्रभागातून  नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2012 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शाहूनगर, संभाजीनगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

नगरसेवकपदाच्या 15 वर्षाच्या काळात अनेक विकासकामे केली. 2017 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना त्यांचा थोड्या मताने पराभव झाला. विधानसभा निवडणुकी दरम्यान 11 ऑक्टोबर 2019 रोजी बहिरवाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता.

आगामी महापालिका निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यापार्श्वभूमीवर बहिरवाडे यांनी घरवापसी केली. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे स्वागत केले. आपण स्वगृही परतल्याचे समाधान असल्याचे बहिरवाडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.