पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला गालबोट लागले आहे. सांगवीत भाजप कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्तेएकमेकांना भिडले. एकमेकांकडे पाहण्यावरुन झालेल्या वादात भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण केल्याचे समजत आहे.
याबाबत सांगवीचे वरिष्ठ निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले, मतदार बुथवर एकमेकांकडे पाहण्यावरून दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादझाला. यावेळी अपक्ष उमेदवाराचे समर्थक गणेश जगताप आणि माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्यात वाद झाला.
भाजपचे माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांना मारहाण झाल्याची चर्चा आहे. दोन्ही गटाचे समर्थक सांगवी पोलीस ठाण्यात जमाझाले आहेत.