माजी उपमहापौर, भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांना खंडणी प्रकरणात अटक

0

पिंपरी : कपडा व्यापाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपाचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

 

पिंपरी बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तीघांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमाहौप डब्बू आसवाणी यांच्या नावाने काही लोक पैसे गोळा करत असल्याची तक्रार होती. आसवांनी यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर तपसाची चक्र फिरली आणि मध्यरात्री तीन वाजता भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह गुड्डू यादव यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली, असे पोलिस सुत्रांनी सांगितले.

आसवाणी यांच्याकडे विचारणा केली असता, होय आठवड्यापर्वी चार-पाच व्यापारी माझ्याकडे आले होते. प्रत्येकाकडून ८५ हजार रुपये या प्रमाणे सुमारे १०० व्यापाऱ्यांकडून ८५ लाख रुपये गोळा कऱण्यात येत असून त्यासाठी डब्बू आसवाणी यांचे नावे पैसे गोळा कऱण्यात येत आहेत, असे त्यांनी मला सांगितले होते. मलाही धक्का बसला, कारण मी एकाही व्यापाऱ्याकडून एक रुपया कधी घेतलेला नाही. त्यामुळे मी लेखी तक्रार केली. पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला आणि तत्काळ कारवाई केली.
2017 च्या महापालिका निवडणुकीत घोळवे मोरवाडी, संभाजीनगर प्रभागातून भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. भाजपने त्यांना उपमहापौरही केले होते. कामगार नेते म्हणूनही ते परिचित आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थक अशी ओळख आहे. कामगार नेते म्हणूनही ते परिचित आहेत.  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थक अशी घोळवे यांची ओळख आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.