मुंबई : बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग प्रकरणी माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांना आरोपी करण्यात आली आहे. संजय पांडे यांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर संजय पांडे यांना अटक करण्यात आले.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 100 कोटींच्या वसुलीच्या संदर्भात सीबीआयने संजय पांडे यांची चौकशी केली. तर एनएसई कंपनी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली. दिल्लीतील ईडीच्या कार्य़ालयात त्यांची चौकशी सुरु होती. सोमवारी सीबीआयने प्रथम पांडे यांची चौकशी केली.
संजय पांडे 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त आहेत.
संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करुन हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीने केला आहे.