पिंपरी : पिंपरीतील एका तरुणाला तू वेडा आहेस असे म्हणून त्याला प्लॉस्टिकची खुर्ची , लाकडी स्टंप , लाकडी बाबुंने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण जखमी करून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे (आठवले गट) माजी अध्यक्ष सुरेश ऊर्फ चिम्या निकाळजे याला मंगळवारी ( दि . 10 ) रोजी अटक केली आहे .
मनोज राजु कसबे (25 रा. मिलिंद नगर पिपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुष्पा राजु कसबे (50 वर्षे , रा. मिलिंद नगर पिपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काळ्या उर्फ सचिन निकाळजे (40) , शौकत समीर शेख (32 , दोघे रा . मिलिंदनगर , पिंपरी ) या दोघांना पोलिसांनी आधी अटक केली होती . त्यानंतर मंगळवारी आरपीआयचा माजी शहराध्यक्ष चिम्या ऊर्फ सुरेश निकाळजे याला अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्या आरोपींसह मनोज अर्जुन जगताप , आनंद कदम , संतोष कदम , भूषण डुलगल व त्यांच्या इतर साथीदारांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी तीनच्या सुमारास पिंपरीतील मिलिंदनगर डिलक्स चौक येथे फिर्यादी पुष्पा यांचा मयत मुलगा मनोज कसबे यांना आरोपीनी ‘तु वेडा आहेस असे वारंवार चिडवत होते, त्यांना मयत मनोज याने मी वेडा नाही तुम्हीच वेडे आहात असे म्हणाल्यावरही आरोपींनी मयत मनोज यांना पुन्हा एकदा तू वेडा आहेस तू वेडा आहेस असे म्हणुन चिडवले. याचा राग येऊन मयत मनोज याने जवळ पडलेल्या काठीने आरोपींना मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यानंतर आरोपींनी चिडुन जावुन मयत मनोज यांना जिवे ठार मारण्यात आले.