सेवा विकासाचे माजी चेअरमन अमर मुलचंदानी यांना अटक

0
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांची बँक असणाऱ्या दि सेवा विकास को-ऑप बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी माजी चेअरमन, उद्योगपती व माजी उपमहापौर अमर मूलचंदानी यांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी बाजार पेठेतील व्यापाऱ्यांची बँक म्हणून सेवा विकास बँक प्रसिद्ध आहे. या बँकेचे अमर मूलचंदानी अध्यक्ष होते. त्यांनी 2010 ते 2019 पर्यंत 238 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या गुन्ह्याप्रकरणी मूलचंदानी यांना रविवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, 420 आणि इतर अतिरिक्त कलमाअंतर्गत मूलचंदानी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पण, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यामुळे त्यांना तात्पुरता स्वरुपात एमसीआरमध्ये ठेवण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.