केंद्रीय माजी मंत्री जावडेकर यांची नवनाथ ढवळे यांच्या निवासस्थानी बैठक

0

पिंपरी : महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी एकाच दिवशी विविध विकास कामांचे उद्घाटन केले. यातूनच निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

आम आदमी पक्षानेही यंदाच्या निवडणुकीत उडी मारली आहे. ‘आप’ने सभा घेऊन महानगरपालिकेच्या सर्व जागा लढविण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या तरी सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच ही निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

भारतीय जनता पक्षानेही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत बैठका सुरु केल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपने तर थेट केंद्रीय माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनाच रिंगणात उतरवले आहे. आज गुरुवारी प्रभाग क्रमांक 37 मधील बुथ प्रमुखांशी संवाद व मार्गदर्शन करण्यासाठी नवनाथ ढवळे यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हजेरी लावली. यावेळी पिंपरी चिंचवड भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप उपस्थित होते. जावडेकर आणि जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक पार पडली.

Leave A Reply

Your email address will not be published.