माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

0

नाशिक : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 88 वर्षांचे होते. माणिकराव गावित नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिले होते.

ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.

गावित यांच्या पार्थिवावर नवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर नाशिकधील खासगी रुग्णाल्यात उपचार सुरू होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती डॉक्टरांनी दिली. माणिकराव गावित सलग ९ वेळा खासदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांनी १९६५ साली ग्रामपंचायतीच्या राजकारणाला सुरुवात केली होती. 1981 साली पहिल्यांदा गावित खासदार झाले होते. त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदी पदांची जबाबदारी संभाळली आहे. ते लोकसभेचे हंगामी अध्यक्षही होते.

Leave A Reply

Your email address will not be published.