पिंपरी : बेंगलोर येथून चोरी केलेली फॉर्च्युनर गाडी पुण्याई विक्रीसाठी आलेल्यास पिंपरी चिंचवडच्या ‘गुंडा स्कॉड’ पथकाने अटक केली आहे. ही कारवाई बेंगलोर-मुंबई द्रुतगती महामार्गावर ताथवडे येथे करण्यात आली.
चेतन बसवराज म्हेत्रे (26, रा. विरभद्रेश्वर मंदिराजवळ, भातब्रा, ता. भालकी, बिदर, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस बेंगलोरहून चोरीची फॉर्च्युनर विक्रीसाठी एक जण पुण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक हरिष माने, अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गंगाराम चव्हाण, विजय तेलेवार, गणेश मेदगे, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी यांनी माहिती काढली.
मंगळवारी सकाळी ही गाडी बेंगलोर द्रुतगती मार्गावरहन8 जाणार असल्याची खात्री झाली. त्यानंतर पोलीस पथकाने सापळा रचून म्हेत्रे आणि गाडी ताब्यात घेतली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने स्वतःच्या मालकाची गाडी चोरल्याचे समोर आले.